नाशिक : कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परीस्थितीत बारदान उपलब्ध न झाल्याने भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेडमार्फत हे बारदान खरेदी केंद्रावर येत असल्याने बारदानाअभावी रखडलेली मकासह इतर भरडधान्य खरेदी जलद गतीने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रब्बीतील भरड धान्य खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदान राज्य सरकार केंद्र शासनाच्या जुट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेत असते. त्यानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे बारदान खरेदीसाठी राज्य शासनाने आतापर्यंत ५८.५० कोटी वेळोवेळी अदा केले आहेत. परंतु कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा बारदान उत्पादनावर परिणाम झाला असून अद्याप जुट कमिशनर यांचेकडून राज्य सरकारला बारदनाचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेले १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय राज्याने घेतला असून नाफेडला ५.८४ कोटी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला अग्रीम देण्यात आले आहे. त्यामुळे नाफेड कडून प्रत्यक्ष बरदान पुरवठा सुरु झाल्याने भरड धान्य खरेदीसाठी लागणाऱ्या बारदानाचा प्रश्न सुटला असून आता जलगतीने भरडधान्य खरेदी होण्याची शक्यता निर्णाण झाली आहे.
मकासह भरडधान्य खरेदीसाठी बारदानाचा प्रश्न सुटला ; नाफेडकडे शिल्लक बारदानाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:14 IST
भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेडमार्फत हे बारदान खरेदी केंद्रावर येत असल्याने बारदानाअभावी रखडलेली मकासह इतर भरडधान्य खरेदी जलद गतीने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मकासह भरडधान्य खरेदीसाठी बारदानाचा प्रश्न सुटला ; नाफेडकडे शिल्लक बारदानाची खरेदी
ठळक मुद्देभरडधान्य खरेदीसाठी बारदान उपलब्ध होणार नाफेडकडून दहा लाख बारदानाची खरेदी