शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांना आठ दिवस क्वारण्टाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:46 IST

सिन्नर: तालुक्यातील काही लोक भाजीपाला व धान्य व्यापार व्यवसायासाठी मुंबई तसेच इतर शहरामध्ये ये-जा करत असल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाहेरगांवाहून येणा-यांची तपासणी करुन त्यांना ८ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे, त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढविता येईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अशा लोकांचे समुपदेशन करावे अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केल्या.

ठळक मुद्देलीना बनसोड : सिन्नरला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

सिन्नर: तालुक्यातील काही लोक भाजीपाला व धान्य व्यापार व्यवसायासाठी मुंबई तसेच इतर शहरामध्ये ये-जा करत असल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाहेरगांवाहून येणा-यांची तपासणी करुन त्यांना ८ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे, त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढविता येईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अशा लोकांचे समुपदेशन करावे अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केल्या.येथील नगरपालिका सभागृहात मंगळवारी(दि.३०) दुपारी ३ वाजता कोविङ संबंधात उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे, प्रांताधिकारी अर्चना पाठारे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तहसिलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रासेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निर्मला गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके आदी उपस्थित होते.बनसोड म्हणाल्या, सिन्नर तालुक्यात २ औद्योगिक वसाहती असून त्यामध्ये बाहेरुन येणा-या कर्मचा-यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे स्क्रिनिंग करावे. लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत कंत्राटी कामगारांची नेमणूक करताना त्यांची कोरोना प्रादूर्भावाच्या दृष्टीने तपासणी होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित एमआयडीसीला सुचना देण्यात याव्यात. तालुक्यात शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची संख्या कमी असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व खासागी डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी त्या सर्वाची यादी तयार करुन व्ही.सी.व्दारे मिटींग घेऊन अवगत करण्यात यावे. जेणेकरुन सर्वांना प्रभावी अंमलबजावणी कामी मार्गदर्शक सुचना देण्यात येतील.तसेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पॅथालॉजी लॅब सुरु करण्या बाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार झालेला असल्याचे सांगत रक्त नमुने व इतर तपासण्या लवकरच सुरु करण्यात येतील अशी ग्वाही बनसोड यांनी दिली.यावेळी पंचायत समिती सिन्नर सभागृहात नगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांशी संवाद साधून कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी बनसोड यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या