शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

आडगावच्या ट्रक टर्मिनल परिसरात वाढले चोऱ्यांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:59 AM

नाशिक/आडगाव : आडगाव ट्रक टर्मिनल, जकात नाका, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी थेट पथदीप बंद करून चोऱ्या केल्या जात असल्याचे अनेक वाहनचालक व व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून ट्रक टर्मिनल परिसरात पोलीस चौकी ...

नाशिक/आडगाव : आडगाव ट्रक टर्मिनल, जकात नाका, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी थेट पथदीप बंद करून चोऱ्या केल्या जात असल्याचे अनेक वाहनचालक व व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून ट्रक टर्मिनल परिसरात पोलीस चौकी द्यावी अशी मागणी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक करत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव ट्रक टर्मिनलच्या परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. या ठिकाणी देशभरातील मालवाहू वाहने, ट्रक विश्रांतीसाठी येतात. चालकांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कमदेखील असते. अशा चालकांवर पाळत ठेवून चोरटे आपला कार्यभाग साध्य करत आहे. याशिवाय मोबाइल,डिझेल,गाड्यांचे स्पेअर पार्टची चोरी, गाड्यांच्या काचा फोडणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. आडगाव पोलीस स्टेशन येथून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. वाहन चालक परराज्यातील असल्यामुळे त्यांना येथील पोलीस स्टेशन माहिती नसल्याने नाइलाजास्तव ते तक्र ार दाखल करत नाही. परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी व येथे पोलीस चौकी द्यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हा