अकरावी प्रवेशासाठी उद्या गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:27 IST2018-06-28T01:26:56+5:302018-06-28T01:27:03+5:30

नाशिक : दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. २९) जाहीर करण्यात येणार आहे.

Quality list for eleventh entry tomorrow | अकरावी प्रवेशासाठी उद्या गुणवत्ता यादी

अकरावी प्रवेशासाठी उद्या गुणवत्ता यादी

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य

नाशिक : दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. २९) जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रिया वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे २५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग-२ भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. भाग दोन भरणाºया विद्यार्थ्यांना गुरुवारीही भाग दोन भरता येणार आहे.

Web Title: Quality list for eleventh entry tomorrow