होप फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव
By Admin | Updated: June 12, 2016 23:37 IST2016-06-12T22:36:05+5:302016-06-12T23:37:02+5:30
होप फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

होप फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव
नाशिक : आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत यश संपादन करायचे असल्यास आत्मविश्वास कमी होऊ न देता जिद्द आणि कठोर मेहनतीची तयारी केली पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण सहायक संचालक दिलीप गोविंद यांनी केले.
गंजमाळ रोटरी हॉल येथे हेल्पिंग आॅपरेस्ड पीपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन अर्थात होप फाउंडेशनतर्फे आयोजित ‘दहावी-बारावीचा गुणगौरव’ व ‘दहावी-बारावीनंतर काय’ या विषयावर करिअर गाइडन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण सहायक संचालक दिलीप गोविंद बोलत होते. व्यासपीठावर विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. एस. नामपल्ली, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, अॅड. नंदकिशोर भुतडा, अॅड. एम. टी. क्यू. सय्यद, डॉ. महेश मालू, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे, माजी आयएएस अॅड. डी. एस. राणा, अॅड. श्रुती भुतडा, भारत स्कॉड गाइजचे सहायक आयुक्त रियाज सय्यद, मोतीवाला कॉलेजचे उपप्राचार्य पंकज नागमोती, होप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नूर-ए-ईलाही शाह आदि उपस्थित होते.
वाचनामुळे आपल्या ज्ञानातही भर पडते व आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात सखोल वाचनाला अधिक महत्त्व आहे. लोकांची कामे करायची असतील तर त्यासाठी प्रशासकीय नोकरी अत्यंत चांगले क्षेत्र आहे, असेही गोविंद यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळातही सहभागी होणे गरजेचे आहे. वाचन, स्वच्छंद जीवनशैली, सुसंगती या गोष्टींमुळे जीवन समृद्ध बनते, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आयएएस आधिकारी अॅड. डी. एस. राणा, पंकज नागमोती यांचेही यावेळी भाषण झाले.