मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा गौरव
By Admin | Updated: July 2, 2014 00:28 IST2014-07-01T23:06:50+5:302014-07-02T00:28:29+5:30
मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा गौरव

मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा गौरव
नाशिकरोड : चेहेडी येथील मैत्री आयुष्यभराची फाउंडेशन संस्थेच्या वतीने परिसरातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन शिबिर पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक हरिष भडांगे, अंबादास ताजनपुरे, बाळासाहेब वाघ, प्रकाश म्हस्के, बाजीराव भागवत, शिवाजी म्हस्के, दशरथ बोराडे, माधव पेखळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष माधुरी भदाणे, राजेश ताजनपुरे, सुदाम बोराडे, पंडित आवारे, विनीत पिंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी परिसरातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दहावी-बारावीनंतर पुढे कोणते क्षेत्र निवडायचे याबाबत गजानन चव्हाण, भाऊसाहेब बोराडे, रेवण कांगणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाट्य अभिनेते दत्ता अलगट यांनी अभिनय क्षेत्राविषयी मार्गदर्शन करत ‘दारुडा मुलगा व म्हातारी आई’ ही एकांकिका सादर केली. प्रास्ताविक ज्ञानेश्वर सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन गजानन चव्हाण व आभार बापू ताजनपुरे यांनी मानले. यावेळी भाऊसाहेब बोराडे, हरिष घोडे, संतोष यंदे, सुनील बोराडे, संदीप पांडे, रेवण कांगणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोठारी कन्या शाळेत गणवेश वाटप
नाशिकरोड : कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रोहन रमेश थोरात, नगरसेवक शोभना शिंदे, सविता दलवानी, अंजना भडके आदि मान्यवर उपस्थित होते.