क़ोपर्डी घटनेचे पडसाद : दोषींवर कठोर करावाईची मागणी
By Admin | Updated: July 20, 2016 01:00 IST2016-07-20T00:12:54+5:302016-07-20T01:00:44+5:30
नाशकात सर्वपक्षीय मूकमोर्चा

क़ोपर्डी घटनेचे पडसाद : दोषींवर कठोर करावाईची मागणी
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाज एकीकरण संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (दि़१९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या़ या मूकमोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़
बी़ डी़ भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मूकमोर्चा शालिमार, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सीटूचे सरचिटणीस डी़ एल़ कराड व छावा संघटनेचे करण गायकर यांनी पीडित मुलीला आठ दिवसांत न्याय देण्याची मागणी केली़
याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करावे, तपासास विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई, महिलांच्या असुरक्षिततेबाबत सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, निर्भयाप्रमाणेच ही केस जलद न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली़.