शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाअंतर्गत गटबाजीला आ‌वर घाला, अमित ठाकरेंची तंबी ; नाशकातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 20:05 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षाअंतर्गत कुरबुरी व गटबाजीसंदर्भात त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे पक्षाचे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी पक्षाचे शहरातील मध्यवर्ती कार्यालय, राजगड येथे दुसऱ्या दिवशीही पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत पक्षांतर्गत गटबाजीला आवर घालण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देअमित ठाकरेंनी नाशकात सलग दोन घेतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधत केली चाचपणी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षाअंतर्गत कुरबुरी व गटबाजीसंदर्भात त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे पक्षाचे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी पक्षाचे शहरातील मध्यवर्ती कार्यालय, राजगड येथे दुसऱ्या दिवशीही पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत पक्षांतर्गत गटबाजीला आवर घालण्याच्या सूचना केल्या आहेत.मनसे अध्यक्ष नाशिकहून पुण्याला रवाना झाल्यानंतर अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी पक्षाचे पदाधिकारी अंकुश पवार, रतनकुमार इचम, अशोक मुर्तडक, आनंता सूर्यवंशी, सलीम शेख, योगेश शेवरे यांच्याशी संवाद साधतानाच पक्षांतर्गत गटबाजी संपवून आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शनिवारी पक्षातील वेगवेगळ्या गटांनी त्यांची भेट घेऊन पक्षासाठी स्थापनेपासून काम करूनही पक्षात न्यायाची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हाच प्रकार अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी शहरातील विभागनिहाय पदाधिकाऱ्यांसोबत साधलेल्या संवादातही समोर आल्याने रविवारी अमित ठाकरे यांनी नाशिक जिल्हा व शहरच्या प्रमुख पदाधिकऱ्यांना खडेबोल सुनावतानाच पक्षांतर्गत गटबाजी व कुरबुरी संपवून पक्षबांधणीवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनविसेचे जिल्हाप्रमुख शाम गोहाड यांच्यासह विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, रामदास दातीर, बंटी लभडे, विक्रम कदम, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष कोरडे, विनायक पगारे, ज्ञानेश्वर बगडे, सत्यम खंडाळे, अरुण दातीर, विजय ठाकरे, अजिंक्य बोडके आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे