कुर्नोलीच्या सरपंचपदी पुष्पा लहांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST2021-02-18T04:25:44+5:302021-02-18T04:25:44+5:30

कुर्णोली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते. परंतु एका जागेसाठी समझोता न झाल्याने निवडणूक लागली होती. ...

Pushpa Lahange as Sarpanch of Kurnoli | कुर्नोलीच्या सरपंचपदी पुष्पा लहांगे

कुर्नोलीच्या सरपंचपदी पुष्पा लहांगे

कुर्णोली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते. परंतु एका जागेसाठी समझोता न झाल्याने निवडणूक लागली होती. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.बी. नरोटे तसेच ग्रामसेविका राजश्री सनेर यांनी काम पाहिले. सरपंच व उपसरपंच इच्छुक अर्जामध्ये प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी पुष्पा भास्कर लहांगे व उपसरपंचपदी शिवाजी कारभारी नाठे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ललित पोटींदे, रोहिणी नाठे, सुरेखा झोमन, इंदू वाघमारे मोतीराम गवळी आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच , उपसरपंच निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

Web Title: Pushpa Lahange as Sarpanch of Kurnoli