भारताच्या पराभवाचा क्रिकेटप्रेमींना धक्का

By Admin | Updated: June 19, 2017 01:47 IST2017-06-19T01:47:24+5:302017-06-19T01:47:37+5:30

नाराजी : सोशल नेटवर्किंग साइट््सवर निषेध, हार्दिक पांड्याच्या फलंदाजीने दिलासा

Pushing India's defeat to cricket fans | भारताच्या पराभवाचा क्रिकेटप्रेमींना धक्का

भारताच्या पराभवाचा क्रिकेटप्रेमींना धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (दि. १८) झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नाशिककर क्रिकेट रसिकांचा पूर्णत: भ्रमनिरास झाला. अनेक नेटिझन्सनी आपला तीव्र संताप सोशल माध्यमातून व्यक्त करत नाराजी प्रकट केली.
भारताचा अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित झाल्यानंतर शहरातील क्रिकेट रसिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते, त्यातच अंतिम सामना रविवारी असल्याने अनेकांनी एकत्र बसून सामन्याचा आनंद घेण्याचे पसंद केले होते. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच अनेकांनी टीम इंडियाला समर्थन देणारे डीपी ठेवले होते.
अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळला. भारताचे आघाडीचे फलंदाज एकीकडे बाद होत असताना हार्दिक पांड्याच्या कामगिरीला मात्र क्रीडापटूंनी सलाम केला. हार्दिक पांड्याने चौफेर फटकेबाजी करत षटकार मारत क्रीडारसिकांचे मनोरंजन केले.

Web Title: Pushing India's defeat to cricket fans