दुचाकीस्वार महिलेला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST2021-05-29T04:12:06+5:302021-05-29T04:12:06+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार पीडिता बुधवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीस पेट्रोल भरण्यासाठी जात असताना ही घटना घडली. कुबेर पेट्रोल पंपासमोरील ...

Pushback to a woman on a two-wheeler | दुचाकीस्वार महिलेला धक्काबुक्की

दुचाकीस्वार महिलेला धक्काबुक्की

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार पीडिता बुधवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीस पेट्रोल भरण्यासाठी जात असताना ही घटना घडली. कुबेर पेट्रोल पंपासमोरील रस्ता ओलांडत असताना ती आपली दुचाकी दुभाजकाजवळ थांबवून उभी असताना इको फोर्ड कार (एमएच १५ एजे २७२२) जवळ येऊन थांबली. कार दुचाकीस चिटकून उभी राहिल्याने महिलेने चालकास पायावरून चाक जाईल असे म्हटल्याने हा वाद झाला. यावेळी संतप्त चालकाने शिवीगाळ करीत आपले वाहन दुचाकीस आडवे लावले व खाली उतरून महिलेशी धक्काबुक्की करीत मारहाण केली. यावेळी महिलेने आपल्या पतीशी संपर्क साधत बोलावून घेतले असता त्यांनाही संशयिताने शिवीगाळ करीत व बघून घेईन अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Pushback to a woman on a two-wheeler