उपनिरीक्षकास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:45 IST2017-09-13T00:45:00+5:302017-09-13T00:45:00+5:30
नाशिक : औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात सुरू असलेल्या दुचाकी तपासणीदरम्यान सातपूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़

उपनिरीक्षकास धक्काबुक्की
नाशिक : औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात सुरू असलेल्या दुचाकी तपासणीदरम्यान सातपूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक रवींद्र कºहे हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कार्बन नाका परिसरात वाहन तपासणी करीत होते़ यावेळी दुचाकीवर आलेला संशयित निरंजन यशवंत मोहिते (५२ रा. शिवाजीनगर) यास थांबण्याचा इशारा केला असता त्याने रस्त्यात वाहन उभे करून आरडाओरड सुरू केली़ पोलिसांनी माझ्या जमिनीच्या वादात लाच घेतली आहे माझ्यावर दादागिरी करायची नाही, अशी हुज्जत घालून कºहे यांना धक्काबुक्की केली़