पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:04+5:302021-08-17T04:21:04+5:30
नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राचार्य ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळा ...

पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल
नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राचार्य ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्षा ज्योती हांडोरे, उपप्राचार्य संगीता पवार, डी. यू. अहिरे, पर्यवेक्षक संजय दीक्षित, चंद्रकांत घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डी. जी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन करून भारतमातेचे पूजन करण्यात आले. सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुकव्दारे करण्यात आले.
बिझनेस बँक, नाशिकरोड
नाशिकरोड, :
येथील बिझनेस बॅंकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त निवृत्त मेजर जनरल सायरस पिठावाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बॅंकेचे अध्यक्ष अशोक तापडिया, ज्येष्ठ संचालक वसंतराव नगरकर यांच्या हस्ते पिठावाला यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिठावाला यांनी स्वातंत्र्यासाठी शहीद झालेले देशभक्त व जवानांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी संचालक बसंत गुरनानी, विजय संकलेचा, नेमिचंद कोचर, सचिन घोडके, डॉ. उमेश नगरकर, दयानंद सदाफुले, आशा जाजू, अंजली राठोड, राजन लोंढे, कमलेश छाजेड, माजी संचालक आशुतोष राठोड, सहाय्यक व्यवस्थापक दिनकर पुंड आदींसह कर्मचारी उपस्थित होते.