शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

पुराच्या चिखलात सोन्याचा शोध ; सराफ बाजारातील गाळ-कचऱ्याची हाताने सफाई

By नामदेव भोर | Updated: August 10, 2019 17:18 IST

गोदावरीला गेल्या रविवारी सोमवारी आलेल्या पुरामुळे नाशिकच्या सराफ बाजारातील लखलखती सोनेरी दुनिया आणि सोन्याचा झगमगाट पाण्याखाली गेला होता. आता पुराचे पाणी ओसरल्याने सराफ बाजारातील झगमगाट पुन्हा परतु लागला असला तरी याच सराफ बाजारातील गल्ल्यांमध्ये साचलेला गाळ, घाण, कचऱ्याची हाताने सफाई करीत सोन्याचे कण मिळवून झारेकरी समाजाच्या महिलांना जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

ठळक मुद्देझारेकरी महिलांचा जगण्यासाठी संघर्षपुराच्या चिखलातून सोण्याच्या कणांचा शोध सराफ बाजारातील कचऱ्यांची हाताने सफाई

नाशिक : गोदावरीला गेल्या रविवारी सोमवारी आलेल्या पुरामुळे नाशिकच्या सराफ बाजारातील लखलखती सोनेरी दुनिया आणि सोन्याचा झगमगाट पाण्याखाली गेला होता. आता पुराचे पाणी ओसरल्याने सराफ बाजारातील झगमगाट पुन्हा परतु लागला असला तरी याच सराफ बाजारातील गल्ल्यांमध्ये साचलेला गाळ, घाण, कचऱ्याची हाताने सफाई करीत सोन्याचे कण मिळवून झारेकरी समाजाच्या महिलांना जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सोन्याचे कण मिळवूण जगण्यासाठी या महिला रस्ता का झाडत आहेत. एक छोटासा ब्रश व एक लोखंडाची तार हातात घेऊन सराफ बाजारातील गल्लीचा कोपरांकोपरा या महिला स्वच्छ करतात. सराफ बाजारातील प्रत्येक दुकानाच्या बाहेर पडलेल्या कचऱ्यावर त्यांचे जीवन, चरितार्थ, रोजीरोटी पिढ्यानपिढ्या चालत आहे. दिवसभर रस्ता झाडून मिळणारा कचरा-माती गोळा करून तो नदीकाठी बऱ्याच वेळा पाण्यात धुतल्यानंतर त्यावरील कचरा/घाण पाण्याबरोबर वाहून जाते व पाटीमध्ये खाली राहिलेली माती/गाळ पुन्हा स्वच्छ केल्यानंतर खाली धातूचे बारीक बारीक कण रहातात. ते अलगद गोळा करून सुकवून चांदी-सोने जे धातुकण असतील ते जमवून सराफाकडे चांदी सोन्याचे परीक्षण करून ते विकतात. आलेल्या पैशातून रोजचा प्रपंच चालवला जातो. झारेकरी समाजातील ९० टक्के महिलाच या काम करतानात दिसून येतात. 

पूर्ण आयुष्यच रस्ता झाडण्यात गेलेसराफ बाजारातील गल्ली संपूर्ण स्वच्छ करून पूर्वी या  महिलांना दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये मिळत, परंतु, आता सराफी व्यवसायात झालेल्या नवीन नवीन यंत्रामुळे  पाच-सहा  दिवसांनंतर पाचशे ते सहाशे रुपये कमाई होते. या महिलांचे पूर्ण आयुष्यच रस्ता झाडण्यात गेले. आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मुले आज मोठमोठे व्यापारी झालेत, दिवस बदललेत. व्यवसाय वाढले. सोन्याचा भाव गगनाला भिडला. परंतु आम्ही आहे त्याच परिस्थितीत असल्याचे या झारेकरी महिला सांगतात. पहिले सकाळीच झाडायचो. परंतु आता रात्री दुकाने बंद होताच झाडायला सुरुवात करतो. कारण आम्ही नाही झाडले, तर दुसरा कोणी येऊन झाडून जाईल. उद्या जे काही मिळणार ते पण मिळायचे नाही, अशी स्थिती असल्याचे या महिला सांगतात.  

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashikनाशिकGoldसोनंSilverचांदीMarketबाजार