शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पुनवेच्या चंद्रप्रकाशात ‘पौर्णिमा महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:15 IST

‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते.

लोकमत  विशेष

नाशिक : ‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते. अशा वातावरणात पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या विविध रिसॉर्टमध्ये ‘पौर्णिमा महोत्सव’ दरमहा रंगणार आहे. पर्यटकांना महामंडळाच्या रिसॉर्टकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.  पौर्णिमेच्या रात्री शांत ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसमवेत निवांत क्षण घालविण्याची मजा काही औरच असते. पर्यटकांचा हा आनंद अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा आणि देशाटनाची सफर मनोरंजनात्मक ठरावी, या उद्देशाने राज्य पर्यटन विकास महामंडळाने आगळावेगळा ‘पौर्णिमा महोत्सव’ हा उपक्रम राज्यभरात राबविण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२२) ताडोबा अभयारण्य परिसरातील पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टपासून करण्यात आली. राज्यातील एकूण २२ ते २५ निसर्गरम्य पर्यटन केंद्रांवरील रिसॉर्टमध्ये दरमहा पौर्णिमेच्या रात्री हा आगळावेगळा महोत्सव रंगलेला पहावयास मिळणार आहे.पौर्णिमेच्या चंद्राची भुरळ अनेक कवी, कादंबरी कथाकार, लेखकांना पडली आहे. महामंडळाच्या या माध्यमाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून लोकांना अधिकाधिक जोडण्यासाठी हा महोत्सव राबविला जात आहे. लेखक, कवी, गायकांच्या कलेद्वारे पर्यटकांना आनंद देणे आणि कवी, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. डिसेंबरअखेर सुरू झालेला हा उपक्रम पुढील वर्षात बारमाही राबविला जाणार आहे.जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तसेच भंडारदरा परिसरातील रिसॉर्टमध्ये पौर्णिमा उत्सव रंगणार असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली. जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथे पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट आहे. तसेच नाशिकपासून जवळच मात्र अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि शिर्डी येथील रिसॉर्टमध्येही पौर्णिमा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.स्थानिक कवी, गायकांना संधी  दर आठवड्याला रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी असते. त्यांच्या मनोरंजनासाठी स्थानिक कवी, गायक, नकलाकार यांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये दर आठवड्याला उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुकांनी प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक