मुदतठेव मोडून १९ ऑक्सिजन सिलिंडर केले खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:14 IST2021-04-25T04:14:26+5:302021-04-25T04:14:26+5:30

पंचवटीत कोरोनामुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी आई सप्तशृंगी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सतनाम राजपूत तसेच ...

Purchased 19 oxygen cylinders by breaking the term deposit | मुदतठेव मोडून १९ ऑक्सिजन सिलिंडर केले खरेदी

मुदतठेव मोडून १९ ऑक्सिजन सिलिंडर केले खरेदी

पंचवटीत कोरोनामुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी आई सप्तशृंगी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सतनाम राजपूत तसेच सदस्यांनी मंडळाच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून मोफत

देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांत तयारी करून मंडळाकडे जमा असलेली ३ लाख रुपये रकमेची मुदतठेव पावती मोडून त्या बदल्यात १९ ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करत ते पंचवटीतील रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे. शनिवारी सेवाकुंज येथे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते मोफत ऑक्सिजन सिलिंडरवाटप लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सतनाम राजपूत, मामा राजवाडे, संदीप देशमुख, विकी जट, राहुल बोकडे, शिवा देशमुख, राजू श्रींग, सुनील धुमाळ, हर्षल पेहरकर, क्रिश राजपूत, सचिन मोरे उपस्थित होते. यावेळी कोरोना नियम पाळून लोकार्पण सोहळा पार पडला.

(फोटो २४ सिलेंडर)

Web Title: Purchased 19 oxygen cylinders by breaking the term deposit