जूनअखेर गावागावात जलकुंभांचे होणार शुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 02:50 PM2019-06-18T14:50:55+5:302019-06-18T14:52:37+5:30

पेठ (रामदास शिंदे )- पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Puranas will be purified in the village by June | जूनअखेर गावागावात जलकुंभांचे होणार शुद्धीकरण

जूनअखेर गावागावात जलकुंभांचे होणार शुद्धीकरण

Next

पेठ (रामदास शिंदे )- पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण जनतेला शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकिय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षा रक्षक यांच्या मदतीने जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार असून हातपंपाची दुरु स्ती व शुध्दीकरण या अभियानात करण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. टीसीएल पावडरची अपलब्धता, वाटप नियोजन व कार्यवाही बाबतची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
-------------------------
कोरडा दिवस पाळा...
नागरिकांनी आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाण्याचे साठे, भांडे रिकामे करून स्वच्छ धुऊन कडक ऊन्हात वाळविण्याचे आवाहन करप्यात आले आहे. तसेच सार्वजनिक जलकुंभाच्या दर्शनी भागात पक्क्या रंगांनी जलकुंभ स्वच्छतेची तारीख प्रदर्शित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.
------------------------------------
साथीच्या आजारांवर उपाययोजना
सद्या पावसाचे दिवस सुरू झाले असून केवळ दुषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार उद्भवतात. अशा वेळी प्रशासनावर मोठा ताण पडत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा संभव असतो. म्हणून पावसाळ्यापुर्वीच यावर उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याने.आगामी काळात साथीचे आजार रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश येईल असे वाटते.

Web Title: Puranas will be purified in the village by June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक