विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 06:17 PM2020-09-20T18:17:27+5:302020-09-20T18:18:23+5:30

कळवण -शहरात अनेकजण तोंडाला मास्क न लावताच विनाकारण फिरत असल्याचे निदशर्नास आले. त्यांच्यावर कळवण नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला.

Punitive action against those who walk without a mask | विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देकळवण:दुकानात गर्दीदिसल्यास प्रथम दंड तर दुसऱ्यांदा दुकान सील होणार

कळवण -शहरात अनेकजण तोंडाला मास्क न लावताच विनाकारण फिरत असल्याचे निदशर्नास आले. त्यांच्यावर कळवण नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टन्ससिंग हे पाळलेच पाहिजे अन्यथा सोमवारपासून कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल यांनी दिला आहे.
पाच दिवसांचा जनता कर्फ्यू संपल्यामुळे सोमवारपासून कळवण शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. शहरात सोशल डिस्टनसिंग देखील पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.
------------------
दंडात्मक कारवाई
व्यक्ती 100 रुपये, भाजीपाला विक्रेता 200 रुपये, शासकिय , निमशासकिय संस्था , कार्यालये , दुकान ( मालक । कमर्चारी / ग्राहक यांना ५००रुपये प्रती व्यक्ती आस्थापना प्रमुख यांचेकडून वसुल करण्यात येईल तर दुस-या वेळेस तीच चुका पुन्हा केल्यास आधी वसूल केलेल्या रक्कमेच्या दुप्पट दंड आकारणी केली जाईल.
----------------------
कळवण शहरात सोशल डिस्टन्सींग ( गर्र्दी आढळल्यास ) कायर्वाही करण्यात येणार असून मद्य विक्री दुकाने : १०,०००/ ( प्रथम वेळेस ), मोठे दुकानांस : ५,००० ( प्रथमवेळेस ) टपरी अथवा छोटे दुकानांस : २००० दुस-या वेळेस तीच चुक केल्यास दुप्पट रक्कमेचा दंड आणि अनिश्चित कालावधीकरीता दुकान सिल केले जाईल .सर्व दुकानदार / ग्राहकांनी मास्क व सॅनिटायझर वापर व गर्दी नियंत्रण कामी स्वत : उपाययोजना करणे बंधनकारक राहणार आहे .
-------
विनामास्क फिरणाºया नागरिकांना प्रत्येकी 100 रुपयांचा दंड आकारण्यास जनता कर्फ्यूपासून सुरुवात केली. या मोहिमेंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातून 35 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून 3 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
----------
गेल्या काही दिवसात नगरपंचायत क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व सरकारी आणि खासगी कार्यालयामध्ये अनेक जण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसून येत होते. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले आहे.
- डॉ सचिन पटेल,मुख्याधिकारी, कळवण

Web Title: Punitive action against those who walk without a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.