मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:05 IST2020-09-30T16:04:38+5:302020-09-30T16:05:18+5:30
पेठ : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पेठ नगरपंचायत प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून ८३ दोषींकडून १४ हजार २०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पेठ येथे व्यावसायिक व नागरिकांची तपासणी करतांना नगरपंचायतीचे पथक.
पेठ : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पेठ नगरपंचायत प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून ८३ दोषींकडून १४ हजार २०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पेठ हे तालुक्याचे मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याने दररोज तालुक्यातून मोठया संख्येने नागरिकांची वर्दळ असते. त्यामूळे मास्क न वापरता फिरणारे नागरिक व कोवीड नियमांचे पालन न करणार्या व्यावसायिकांविरोधात नगरपंचायतीच्या तपासणी पथकाव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिक, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी व शासकीय कार्यालयांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष मनोज घोंगे, मुख्याधिकारी शुभम गुप्ता यांनी केले आहे.