परभणी घटनेतील आरोपीला शिक्षेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:09 IST2018-04-27T00:09:32+5:302018-04-27T00:09:32+5:30
मालेगाव : परभणी येथील घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी हम हिंदुस्तानी संघटनेच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

परभणी घटनेतील आरोपीला शिक्षेची मागणी
मालेगाव : परभणी येथील घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी हम हिंदुस्तानी संघटनेच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. परभणी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. या घटनेचा येथील हम हिंदुस्तानी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील संशयीत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी दीपक जगताप, रविंद्र बच्छाव, मच्छिंद्र शिर्के, ऋषीकेश निकम, गोरख चौधरी, दिनेश चौधरी, सिद्धार्थ वारुळे, गोविंद चौधरी, प्रज्वल शर्मा, पवन गवळी, शक्ती सोदे, सुरज जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.