के. के. वाघ चांदोरी महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची ४.७३ लाखांची शिष्यवृत्ती

By Admin | Updated: June 1, 2014 01:11 IST2014-05-31T19:12:36+5:302014-06-01T01:11:18+5:30

चांदोरी : येथील क. का. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये पुणे विद्यापीठाकडून गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती, क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती यासाठी सुमारे चार लाख ७३ हजार इतक्या रकमेच्या विविध शिष्यवृत्त्या प्राप्त झालेल्या आहेत. या शिष्यवृत्त्यांमध्ये राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती - १,२६,०००/- क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना - ५०,०००/-, गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती - २,४०,०००/-, आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती- ५७०००/- अशी एकूण ४,७३,०००/- इतकी शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झाली आहे.

Of Of Pune University's scholarship of 4.73 lakh to Wagh Chandori College | के. के. वाघ चांदोरी महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची ४.७३ लाखांची शिष्यवृत्ती

के. के. वाघ चांदोरी महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची ४.७३ लाखांची शिष्यवृत्ती

चांदोरी : येथील क. का. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये पुणे विद्यापीठाकडून गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती, क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती यासाठी सुमारे चार लाख ७३ हजार इतक्या रकमेच्या विविध शिष्यवृत्त्या प्राप्त झालेल्या आहेत. या शिष्यवृत्त्यांमध्ये राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती - १,२६,०००/- क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना - ५०,०००/-, गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती - २,४०,०००/-, आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती- ५७०००/- अशी एकूण ४,७३,०००/- इतकी शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झाली आहे.
चांदोरी परिसरातील शेतकर्‍यांना निसर्गाच्या सततच्या संकटामुळे व अवकाळी पावसामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या शिष्यवृत्तीमुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठ व महाविद्यालयाचे आभार मानले असून, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा आर्थिक भार कमी झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Of Of Pune University's scholarship of 4.73 lakh to Wagh Chandori College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.