पुणे विद्यापीठाची शिष्यवृत्ती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:53+5:302021-02-26T04:18:53+5:30

नाशिक: शहरातील विविध सात ठिकाणी जेईई मेन परीक्षेला प्रारंभ झाला आहे. काेरोना नियमांचे पालन करून शहरातील केंद्रांवर परीक्षा सुरू ...

Pune University Scholarship Scheme | पुणे विद्यापीठाची शिष्यवृत्ती योजना

पुणे विद्यापीठाची शिष्यवृत्ती योजना

नाशिक: शहरातील विविध सात ठिकाणी जेईई मेन परीक्षेला प्रारंभ झाला आहे. काेरोना नियमांचे पालन करून शहरातील केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. येत्या २६ पर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे सहा विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत.

महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धा

नाशिक: जिल्हा तालीम संघाच्यावतीने नुकतीच महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या केसरी स्पर्धेच्या तयारीसाठी भगूर येथील न.ल. बलकवडे क्रीडा संकुलात चाचणी घेतली जात आहे. या चाचणीमध्ये जिल्ह्यातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते.

वेतन आयोगाच्या मागणीसाठी अन्नत्याग

नाशिक: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी येत्या १ तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Pune University Scholarship Scheme