शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

उमेदवाराला अटक करायला आलेले पुणे पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 3:06 PM

नाशिकच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित पवार यांना बेड्या ठोकण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या; मात्र अचानकपणे कारवाई थांबविली गेली आणि तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

ठळक मुद्देपुण्याचे पोलीस दाखल झाले; मात्र ‘कर्तव्य’ न बजावता परतले१ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रूपयांना गंडा

नाशिक : विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारासमोर बंडखोरी करत नांदगाव मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले रत्नाकर ज्ञानदेव पवार यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात सुमारे दीड कोटींची फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पवार यांना अटक करण्यासाठी शनिवारी (दि.२६) सकाळी नाशिकमध्ये पुण्याचे पोलीस दाखल झाले; मात्र त्यांना ‘कर्तव्य’ न बजावता रिकाम्या हाती परतावे लागल्याने पोलीस व राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पवार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांना नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्याने शिवसेनेचे विजयी उमेदवार सुहास कांदे यांच्याविरूध्द बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांच्याविरूध्द आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी मोहद्दीस महंमद फारूख बखला यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे.संशयितांमध्ये त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांचेही नाव आहे. मोहद्दीस हेदेखील पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिक कंपनीचे भागीदार आहेत. तसेच त्यांची टुर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्सची स्वत:ची कंपनीही आहे. त्यांना फेब्रुवारी २०१७ साली संशयित अनिस वली महंमद मेमन (रा. कोंढवा खुर्द, पुणे) याने पवार दाम्पत्यासह अन्य संशयित रविंद्र राजविर सिंह, सोनिया रविंद्र सिंह (दोघे रा.कल्याणीनगर पुणे) प्रकाश पासाराम लढ्ढा, (रा.भाभानगर, द्वारका नाशिक), अशोक परशुराम अहिरे (रा. महात्मानगर, नाशिक,) यांच्यासोबत ओळख करून दिली. या सर्वांनी एकत्रित व्यवसाय करण्याच्या नावाखाली बखला यांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कोंढव्याचे एक पथक शनिवारी नाशिकमध्ये पुन्हा येऊन धडकले. दरम्यान, नाशिकच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित पवार यांना बेड्या ठोकण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या; मात्र अचानकपणे कारवाई थांबविली गेली आणि तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे नाशिक शहरातील पोलीस वर्तुळात तसेच राजकिय क्षेत्रात उलटसुलट चर्चा ऐकू येत होती. या आर्थिक फसवणुकीत पवार दाम्पत्यास मुख्य संशयित आरोपी आहेत.पवार यांनी फिर्यादी बाखला यांना बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्यास आकर्षक आमिष दाखवून भाग पाडले. सर्व संशयितांनी संगनमताने फसवणूकीच्या उद्देशाने १ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रूपयांना गंडा घातल्याचे बाखला यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पवार यांच्याविरूध्द यापुर्वीही विविध गुन्हे दाखल असून पुणे, नाशिकच्या न्यायालयात खटले सुरू आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPuneपुणेfraudधोकेबाजीArrestअटक