महिला पोलीस कर्मचाऱ्याने दाखविली समयसूचकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:03+5:302021-01-08T04:43:03+5:30

देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनसमोरील वडनेर रोडलगत सकाळी दहा वाजल्यापासून एक गाय प्रसूतीसाठी रेंगाळत असल्याचे आशा खैरनार यांचे निदर्शनास आले. ...

Punctuality shown by female police officers | महिला पोलीस कर्मचाऱ्याने दाखविली समयसूचकता

महिला पोलीस कर्मचाऱ्याने दाखविली समयसूचकता

देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनसमोरील वडनेर रोडलगत सकाळी दहा वाजल्यापासून एक गाय प्रसूतीसाठी रेंगाळत असल्याचे आशा खैरनार यांचे निदर्शनास आले. गाईगुरांसोबत माहेरी कोठुरे येथे बालपण घालविणाऱ्या आशा यांनी सासरी देवळा येथे ही जनावरांना सोबतची नाळ कायम ठेवली असल्याने, त्यांच्या निदर्शनास गायीची प्रसृती वेदना आली. त्यांनी तातडीने दोघा होमगार्डंना सोबत घेऊन, त्या गाईच्या प्रसूतीसाठीची उपाययोजना केली. गाईला वासरू झाले. मात्र, तिला भटके कुत्र्यांनी त्रास देऊ नये, म्हणून स्वत: तेथे हजर राहून, गाय व वासरास गरम पाण्याने धुतले. खैरनार यांनी स्वत: पुढाकार घेऊन केलेल्या या कामाची सर्वत्र चर्चा होत असून, जबरी ग्रुपचे संतोष गायकवाड, रवी गांगुर्डे, राजू वाघमारे, प्रशांत बागुल यांनी खैरनार यांचा सत्कार केला.

मुक्या प्राण्यांवर दया करा

लहानपणापासून मुक्या प्राण्याविषयी प्रेम आहे, गाईच्या प्रसूतीचा अनुभव असल्याने, तिच्या वेदना लक्षात आल्या व त्यानुसार उपाययोजना केली. तिची सुखरूप प्रसूती हेच खरे समाधान असून, सर्वांनी मुक्या प्राण्यांना दया दाखविणे गरजेचे आहे.

- आशा खैरनार, महिला हवालदार

Web Title: Punctuality shown by female police officers