पंचवटीत गुंडांचा धुडगूस
By Admin | Updated: May 16, 2017 00:46 IST2017-05-16T00:46:23+5:302017-05-16T00:46:34+5:30
पंचवटी :पाथरवट लेन परिसरात टोळक्यांनी हातात लाठ्या-काठ्या, तलवारी व धारदार शस्त्रास्त्रे घेऊन परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी व रिक्षाची तोडफोड केली

पंचवटीत गुंडांचा धुडगूस
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी :पाथरवट लेन परिसरात रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात पंचवीस ते तीस जणांच्या टोळक्यांनी हातात लाठ्या-काठ्या, तलवारी व धारदार शस्त्रास्त्रे घेऊन परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी व रिक्षाची तोडफोड करून दहशत निर्माण केली.
परिसरातील वाहनांच्या काचा फोडण्यापाठोपाठ संशयितांनी नागरिकांना शिवीगाळ केल्याने परिसरात काहीकाळ प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. पाथरवट लेनमध्ये रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमाराला पंचवीस ते तीस संशयितांचे टोळके आले. त्यांनी हातातील लाठ्या, काठ्या, तलवारी व शस्त्रास्त्रे भिरकावून चार ते पाच दुचाकी, दोन-तीन रिक्षा तसेच काही चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. संशयितांनी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही मारहाण करीत होते. टोळीने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. संशयितांनी पाथरवट लेन ते गजानन चौक परिसरात उभी असलेली अनेक वाहने रस्त्यावर पाडली तर वाहनांच्या काचा फोडल्या. परिसरात गुंडांनी धुमाकूळ घातल्याचे वृत्त कळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित हे वाल्मीकनगर, वाघाडी परिसरातील असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, रात्री तणावाचे वातावरण होते.