शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुकणे’तून ९०० दलघफू आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:02 IST

शहराला पाणीपुरवठ्यासाठी नेहमी गंगापूर धरणातून पाणी आरक्षण वाढवून घेण्यावर महापालिकेचा भर असतो. यंदा मात्र गंगापूरऐवजी मुकणे धरणातून आरक्षण वाढवून घेणार आहे. गेल्यावर्षी या धरणातून पाणी आरक्षण ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित होते, मात्र यंदा याच धरणातून ९०० दशलक्ष घनफूट आरक्षण मागण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी मंगळवारी (दि.२७) दिली.

नाशिक : शहराला पाणीपुरवठ्यासाठी नेहमी गंगापूर धरणातूनपाणी आरक्षण वाढवून घेण्यावर महापालिकेचा भर असतो. यंदा मात्र गंगापूरऐवजी मुकणे धरणातून आरक्षण वाढवून घेणार आहे. गेल्यावर्षी या धरणातून पाणी आरक्षण ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित होते, मात्र यंदा याच धरणातून ९०० दशलक्ष घनफूट आरक्षण मागण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी मंगळवारी (दि.२७) दिली.शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून, त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी प्रथेप्रमाणे मंगळवारी (दि.२७) जलपूजन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या वतीने गंगापूर धरणातून सर्वाधिक पाणी आरक्षण घेत असते. तथापि, गंगापूर धरणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी होत आहे. त्यातच चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी उपसा करण्यातही अनेक तांत्रिक अडचणी आल्या. या धरणावर ताण वाढत आहे. धरणातून महापालिकेने पाणी आरक्षण वाढवून मागितले की जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाºया बैठकीत शहरात उधळपट्टी होत असल्याचा मुद्दा पुढे केला जातो. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने धरणातून चांगले आरक्षण मिळाले होते. यात गंगापूर धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट, दारणा आणि मुकणे धरणातून प्रत्येकी ३०० म्हणजेच एकूण ४८०० दलघफू आरक्षण मिळाले होते. त्यावेळी मुकणे थेट जलवाहिनी योजना अपूर्ण होती. दरम्यान,जलपूजन सोहळ्यास उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती उध्दव निमसे, आयुक्त राधाकृष्ण गमे, माजी सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता सतीश सोनवणे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, नदींनी बोडके यांच्यासह अन्य नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.महापालिकेने आता या धरणावरून अधिकाधिक भागात पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण वाहिन्यांचे जाळे विणले आहे. त्यामुळे या धरणावरून पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून ४२००, मुकणे धरणातून ९०० तर दारणा धरणातून पुन्हा ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.चेहेडी शुद्धीकरण लवकरचचेहेडी बंधाºयाच्या जवळ देवळाली कॅम्प आणि भगूर नगरपालिकेचे मलजलयुक्त पाणी सोडले जात असल्याने महापालिकेला पावसाळ्याच्या आधी बंधाºयातून पाणी आटल्यानंतर अडचण निर्माण होते.४ आता महापालिकेच्या वतीने लवकरच बंधाºयात ज्या भागात मजजल सोडले जाते त्याच्या पुढे जाऊन पाणी घेण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पुढील वर्षी उन्हाळ्याच्या आत हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका