प्फॉगिंग मशीन बंद का?

By Admin | Updated: November 13, 2014 00:25 IST2014-11-13T00:25:35+5:302014-11-13T00:25:57+5:30

महापौर आज घेणार बैठक : काँग्रेसने केली कारवाईची मागणी

Is the Puffing Machine Off? | प्फॉगिंग मशीन बंद का?

प्फॉगिंग मशीन बंद का?

नाशिक : शहरात डेंग्यू पसरविणाऱ्या डासांनी उच्छाद मांडला असताना महापालिकेच्या गुदामात मात्र १७ नवेकोरे फॉगिंग मशीन वापराविना पडून आहेत. त्याची दखल घेऊन महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरुवारी तातडीने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहेत. दुसरीकडे ऐनरोगराईत अशी बेपर्वाई दाखवणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॉँग्रेस नगरसेवक विमल पाटील यांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात डेंग्यूची साथ असून, त्यामुळे नागरीक त्रस्त आहेत. अशा स्थितीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तातडीने कार्यवाही अपेक्षित असताना त्यांच्याकडून मात्र संथगतीने कारवाई सुरू असून, डेंग्यूसाठी सामान्य नागरिकांनाच दोषी ठरवण्याचे प्रकार सुरू आहेत. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी, तर शहरात चारच फॉगिंग मशीन असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात सतरा छोटे फॉगिंग मशीन व्दारका येथील पालिकेच्या कार्यालयात पेटीपॅक अवस्थेत पडून आहेत. दोन मोठी आणि सतरा मशीन ऐन रोगराईच्या काळात पडून असून, त्याबाबत प्रशासन मौन बाळगून आहेत. त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापौर अशोक मुर्तकड यांनी गुरूवारी (दि.१२) आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. दुसरीकडे लोकमतच्या वृत्ताचाच संदर्भ घेऊन कॉँग्रेस नगरसेवक विमल पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. दोन महिन्यांपासून डासांनी उच्छाद मांडला आहे. डेंग्यू आणि मलेरिया झालेले असंख्य रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अश स्थिती आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे नवेकोरे फॉगिंग मशीन धूळ खात पडून आहेत. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध मुंबई प्रांतीक महापालिका अधिनियम १९४९ च्या ५६ (२) अन्वये कारवाई करावी अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Is the Puffing Machine Off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.