अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड

By Admin | Updated: May 6, 2017 23:00 IST2017-05-06T22:59:45+5:302017-05-06T23:00:07+5:30

ंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी शहरातील सातही केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली

Puffed up to fill the application | अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड

अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी शहरातील सातही केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली. येथील पश्चिम भागातील कॅम्प रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळपासून गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर दिवसभरात वाहतूक कोंडी झाली होती. तर सर्वसामान्य शहरवासीयांची यामुळे डोकेदुखी झाली.
शहरातील पश्चिम भागातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तंत्र विद्यालय येथे सहा प्रभागातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे संगमेश्वर, कॅम्प रस्ता, सटाणा नाका, सोयगाव, मालेगाव कॅम्प, द्याने, रमजानपुरासह इतर काही भागातील प्रभागांचा सहभाग आहेत. येथील असंख्य उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या सुरूवातीपासून संथ गतीने अर्ज भरले. अंतिम दोन दिवसात शुक्रवारी शहरभरात २१९ अर्ज भरण्यात आले आहे.
आज शनिवारच्या शेवटच्या दिवशी अजुन २००च्या आसपास अर्ज दाखल होतील. असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळपासून या केंद्रावरचे रस्ते उमेदवारांच्या व समर्थकांच्या गर्दीने फुलले होते. विविध पक्षांचे झेंडे, कार्यकर्त्यांच्या डोक्यावर टोप्या, गळ्यात मफलर असा पेहराव केलेले उत्साही कार्यकर्ते रस्त्यांवर आपल्या उमेदवाराच जयघोष चा नारा, पक्षांची घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला होता.
या गर्दीमुळे राष्ट्रीय पक्षांचे अनेक उमेदवारांचे तिकीट टांगणीला होते. त्यांना त्या-त्या पक्षाचे अ‍ेबी अर्ज मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून आले तर केंद्रामधुन प्रत्येक उमेदवारांसाठी व खास पक्षांच्या उमेदवारांसाठी ध्वनिक्षेपकावरून अ‍ेबी अर्ज सोबतच अथवा आज मुदत अखेर ३ वाजेपर्यंत दाखल करण्याची सूचना अधिकारी करत होते. येथील शासकीय तंत्र विद्यालयात उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी पटांगणात मंडप टाकण्यात आला होता. परिसरात एकच गर्दी उडाल्याने कार्यकर्त्यांनी वाहनतळ, झाडाखाली तळ ठोकला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस गर्दीने फुलून गेला होता.

Web Title: Puffed up to fill the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.