शालेय स्मरणिका ‘प्रतिबिंब’चे प्रकाशन

By Admin | Updated: June 26, 2014 00:48 IST2014-06-26T00:36:04+5:302014-06-26T00:48:46+5:30

शालेय स्मरणिका ‘प्रतिबिंब’चे प्रकाशन

Publication of school museum 'reflection' | शालेय स्मरणिका ‘प्रतिबिंब’चे प्रकाशन

शालेय स्मरणिका ‘प्रतिबिंब’चे प्रकाशन


नाशिक : येथील कामगारनगर- मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये ‘प्रतिबिंब’ या शालेय स्मरणिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. महापालिका शाळांविषयी असलेला समाजाचा दृष्टिकोन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, राबविण्यात येणारे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम याविषयीची माहिती सदरच्या स्मरणिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी नगरसेवक उषा अहेर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विक्रांत मते, विलास शिंदे, रंजन ठाकरे आदि उपस्थित होते. प्रशासनाधिकारी किरण कुवर यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक श्रीमती सिंगासने यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Publication of school museum 'reflection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.