‘काका कडेपूरकर’ पुस्तकाचे प्रकाशन
By Admin | Updated: August 5, 2014 01:52 IST2014-08-05T01:34:21+5:302014-08-05T01:52:27+5:30
‘काका कडेपूरकर’ पुस्तकाचे प्रकाशन

‘काका कडेपूरकर’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक काका कडेपूरकर यांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू आहे़ यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘काका कडेपूरकर’ या पुस्तकाचे रविवारी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़
काकांनी हिंदी प्रचाराच्या कार्याला वाहून घेतले होते़ त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिंदी राष्ट्रभाषा, पुणे यांनी १९७१ मध्ये काकांचा सत्कारही केला होता़ काकांच्या आठवणींना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उजाळा मिळावा यासाठी त्यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले लेख तसेच त्यांच्या कार्याबद्दल ज्येष्ठांनी सांगितलेल्या आठवणी शब्दबद्ध करून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे़ कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात काका कडेपूरकर यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ३५ मिनिटांची आॅडिओ-व्हिडीओ क्लिपही दाखविण्यात आली़ तसेच एक प्रतीकात्मक हिंदी नाटिकाही सादर करण्यात आली़
या कार्यक्रमाचे संयोजन हर्षवर्धन कडेपूरकर यांनी केले होते़ या पुस्तक प्रकाशन समारंभाला दादा रत्नपारखी, अरविंद पोतनीस, वसुधा कडेपूरकर, वसंतराव हुदलीकर, विद्याताई चिटको, लोकेश शेवडे, जयकृष्ण शर्मा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)