सप्तर्षी माळी लिखित ‘ज्ञानज्योती’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST2021-01-09T04:12:15+5:302021-01-09T04:12:15+5:30

नाशिक : जोतिबा फुले-सावित्रीबाईंची भूमिका करणारे अभिनेते योगेश वाघ व अभिनेत्री विनिता मोडक यांच्या हस्ते सप्तर्षी माळी ...

Publication of 'Jnanjyoti' written by Saptarshi Mali | सप्तर्षी माळी लिखित ‘ज्ञानज्योती’चे प्रकाशन

सप्तर्षी माळी लिखित ‘ज्ञानज्योती’चे प्रकाशन

नाशिक : जोतिबा फुले-सावित्रीबाईंची भूमिका करणारे अभिनेते योगेश वाघ व अभिनेत्री विनिता मोडक यांच्या हस्ते सप्तर्षी माळी लिखित ज्ञानज्योती (बालनाट्य) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कालिदास कला मंदिर येथील कार्यक्रमात अक्षरबंध प्रकाशनतर्फे सप्तर्षी माळी लिखित बालनाट्य ज्ञानज्योतीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी निर्माता दिग्दर्शक राजेश शर्मा यांच्यासह माळी सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, प्रकाशक प्रवीण जोंधळे आदी उपस्थित होते. थोर महापुरुषांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी नाटक आणि पुस्तक हे माध्यम महत्त्वाचे काम करीत असतात. त्याचप्रमाणे सप्तर्षी माळी यांनी लिहिलेले ज्ञानज्योती हे पुस्तकही सावित्रीबाईंचे विचार घराघरांत पोहोचविण्याचे काम करेल, असा विश्वास राजेश शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

(आरफोटो-०८ बूक पब्लिश) ज्ञानज्योती बालनाट्याचे प्रकाशन करताना अभिनेते योगेश वाघ व अभिनेत्री विनिता मोडक यांच्यासह राजेश शर्मा, सप्तर्षी माळी, प्रवीण जोंधळे आदी.

Web Title: Publication of 'Jnanjyoti' written by Saptarshi Mali