दीप्ती जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

By Admin | Updated: July 14, 2017 01:30 IST2017-07-14T01:30:01+5:302017-07-14T01:30:19+5:30

नाशिक : दीप्ती जोशी यांच्या ‘नि:शब्दाचे मौन’ या कथासंग्रहाचे प्रकाशन दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Publication of Dipti Joshi's book | दीप्ती जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

दीप्ती जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दीप्ती जोशी यांच्या ‘नि:शब्दाचे मौन’ या कथासंग्रहाचे प्रकाशन दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर दत्ता पाटील, वंदना अत्रे, मनीषा देवकर, दीप्ती जोशी, डॉ. सुभाष आफळे व श्याम जोशी उपस्थित होते.
नि:शब्दाचे मौन हा दीप्ती जोशी यांचा पहिलाच कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. दीप्ती जोशी यांच्या अनेक कथांना कथा स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मानवी भावभावनांची सुरेख गुंफण असलेला हा कथासंग्रह अतिशय वाचनीय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. डॉ. मधुरा आफळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्यिक व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Publication of Dipti Joshi's book