रेट्रोस्पेक्टीव्ह ॲन्ड रिव्ह्यूज पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:48+5:302021-01-18T04:12:48+5:30

नाशिक : देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडलेल्या विविध सामाजिक घटना, घडामोडींचा अभ्यासपूर्ण परामर्श डॉ. प्रवीण घोडेस्वार ...

Publication of the book Retrospective and Reviews | रेट्रोस्पेक्टीव्ह ॲन्ड रिव्ह्यूज पुस्तकाचे प्रकाशन

रेट्रोस्पेक्टीव्ह ॲन्ड रिव्ह्यूज पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडलेल्या विविध सामाजिक घटना, घडामोडींचा अभ्यासपूर्ण परामर्श डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी त्यांच्या सोशल रिडींग्ज रेट्रोस्पेक्टीव्ह ॲन्ड रिव्ह्यूज या इंग्रजी पुस्तकातून घेतला आहे. हे पुस्तक सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक तसेच शिक्षकांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‍ कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या सोशल रिडींग्ज रेट्रोस्पेक्टीव्ह ॲन्ड रिव्ह्यूज या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. ई. वायुनंदन बोलत होते. या पुस्तकात डॉ. घोडेस्वार यांच्या यापूर्वी प्रकाशित ३२ लेखांचा समावेश असून त्यांनी यातून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबुराव बागुल, शाहीर अमर शेख,‍ विद्या बाळ, राहीबाई पोपरे यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समुदायावर परिणाम करणारा कायदा, कुपोषण, भारतीय राज्यघटना, झुंडीने केलेल्या हत्या, उदयोजकीय सामाजिक जबाबदारी निधी, बाल मनोरंजन धोरणाची गरज, मानवी हक्क, स्त्री सक्षमीकरणासाठी दूरस्थ शिक्षण, युवा लोकसंख्या, भारत बदलणारे पर्यटन, राष्ट्रीय सेवा योजनेची ५० वर्षे, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका प्रचार, एक देश एक निवडणूक, संविधान उद्देशिका वाचन यासारख्या ‍विषयांचा आढावा घेण्यात आलेला आहे. पुण्याच्या आव्हान बुक स्मिथस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडेदेखील उपस्थित होते. कोविड-१९ मुळे या पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक कार्यक्रमात न करता कुलगुरुंच्या दालनात करण्यात आले.

Web Title: Publication of the book Retrospective and Reviews