श्री शंकर महाराजांवरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:57+5:302021-07-22T04:10:57+5:30
नाशिक : श्री शंकर महाराज मठ, उत्तमनगर, नाशिक येथे ‘श्री शंकर दर्शन’ या अभंग चरित्राचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी ...

श्री शंकर महाराजांवरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन
नाशिक : श्री शंकर महाराज मठ, उत्तमनगर, नाशिक येथे ‘श्री शंकर दर्शन’ या अभंग चरित्राचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आले. श्री शंकर महाराज यांच्या जीवनावर अनेक ग्रंथ असून, अभंग स्वरूपात पहिलेच चरित्र प्रकाशित झाले आहे.
या ग्रंथाचे काव्यमय चरित्र लेखन ह.भ.प. रामकृष्णादादा महाराज पाटील जामनेरकर यांनी केले आहे. उत्तमनगर मठाचे मठाधिपती परम पूज्य सद्गुरू श्री संजय हिरे महाराज यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी सावळीराम तिदमे, अ. भा. सूर्योदय सर्व समावेशक साहित्य मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, सामाजिक कार्यकर्ते गिरीश चिटणीस, सुरेखा जाधव हे प्रमुख पाहुणे होते. ‘अंतापूरचे अवलिया’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती, ‘श्री शंकर दर्शन’ या श्री शंकर महाराजांचे अभंग चरित्रासोबत ‘शंकर पाठ’ व ‘शंकर चालिसा’असा अनमोल खजिना श्री शंकर महाराज मठ, उत्तमनगर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला. श्री शंकर दर्शन या ग्रंथाचे सहायक लेखक अनिल वाळुंजे, सचिन कंदलकर यांचाही सद्गुरू हिरे महाराज यांनी सत्कार केला. प्रास्ताविक सुभाष शहाणे यांनी, सूत्रसंचालन बाळासाहेब गुंजाळ यांनी तर आभार अनिल वाळुंजे यांनी केले.
फोटो
२१शंकर महाराज
श्री शंकर महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रकाशन करताना सतीश जैन. समवेत सावळीराम तिदमे, प्रा. रामकृष्ण पाटील, गिरीश चिटणीस, संजय हिरे आदी.