सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:19 IST2020-08-14T22:41:12+5:302020-08-15T00:19:51+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजऱ्या होणाºया गणेशोत्सवास ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने दुर्गा देवी माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नाही
ओझर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजऱ्या होणाºया गणेशोत्सवास ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने दुर्गा देवी माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, ग्रामसेवक दत्तात्रय देवकर, सदस्य प्रकाश महाले, सचिन मोगल, महावितरणाचे अधिकारी विक्रम सोनवणे, प्रशांत पगार, शिवसेना शहरप्रमुख नितीन काळे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीपाद देशमुख, प्रशांत अक्कर, सुयोग गायकवाड, मनीष मंडलिक, अनिल गवळी, सागर शेजवळ, मित्तल मंडलिक, गोविंद कोसेकर, मनोज तापकिरे, वैभव कदम, शुभम भोस, संतोष सोनवणे, दीपक तांबट, बालाजी लढ्ढा, सौरभ कोरडे, सुधाकर पुंड, गुणेंद्र तांबट, अजिंक्य भंडारे आदी उपस्थित होते. गणेशमूर्ती विक्रेत्यांना विश्वसत्य महाविद्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाणार असून, ज्यांच्याकडे खासगी जागा आहे त्यांनी आपल्या खासगी जागेत विक्री करावी, असे आवाहन यतीन कदम यांनी केले पोलीस प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयाने दिलेल्या नियम अटींना अधीन राहून गणेशोत्सव साजरा करण्यात यावा तसेच गणेश मंडळांनी आॅनलाइन पद्धतीने परवानगी घ्यावी सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण होईल अशा मंडळांना परवानगी दिली जाणार नाही. स्थापना व विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही, जागेवरच पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.