आराई येथे जनता कर्फ्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:47 IST2021-04-15T21:48:36+5:302021-04-16T00:47:23+5:30
जुनी शेमळी : आराई येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दि.२० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे प्रशासनाच्या वतीने करण्याचे ठरले आहे.

आराई येथे जनता कर्फ्यु ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने निर्मन्युष्य झालेले रस्ते.
ठळक मुद्देकोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य
जुनी शेमळी : आराई येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दि.२० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे प्रशासनाच्या वतीने करण्याचे ठरले आहे.
पाच दिवस गावातील सर्व लहान-मोठे व्यापारी, भाजीपाला विक्रेते, किरकोळ विक्रेते यांनी आपले व्यवहार बंद ठेऊन गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनासह सरपंच मनिषा अहिरे यांनी केले आहे.