सायकल रॅलीतून क्षयरोगाची जनजागृती
By Admin | Updated: March 22, 2015 23:59 IST2015-03-22T23:59:07+5:302015-03-22T23:59:17+5:30
सायकलवर जनजागृती फलक : सत्तर सायकलस्वारांचा सहभाग

सायकल रॅलीतून क्षयरोगाची जनजागृती
नाशिक : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नाशिक सायकलिस्टतर्फे सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली़ या रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी क्षयरोग जनजागृतीचे फलक लावलेले होते़ या अभिनव उपक्रमाबद्दल या रॅलीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले़
ग्रामीण भागात अजूनही क्षयरोगाबाबत जनजागृती झालेली नाही़ क्षयरोग हा उपचाराने पूर्णत: बरा होतो, हे नागरिकांना सांगणे गरजेचे असून, यासाठी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने पुढाकार घेऊन रविवारी जनजागृतीपर रॅली काढली़ रॅलीच्या वतीने नागरिकांना क्षयरोगाची व उपचारांची माहिती देण्यात आली़
यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष विशाल उगले, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक हरिष बैजल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ़ देवरे, मनीषा रौंदळ, ऋषिकेश वाकतकर, नाना गायकवाड, बिरमाने महाराज यांच्यासह ७० सायकलस्वारांनी या रॅलीत सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)