गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्यापासून जनजागृती

By Admin | Updated: October 24, 2015 23:27 IST2015-10-24T23:26:43+5:302015-10-24T23:27:10+5:30

गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्यापासून जनजागृती

Public awareness from tomorrow to prevent crime | गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्यापासून जनजागृती

गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्यापासून जनजागृती

नाशिक : गेल्या वर्षभरात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून, तिला आळा घालण्यासाठी ‘सनविवि फाउंडेशन व ‘जगदिशा मेमोरियल फाउंडेशन’ पुढे सरसावले आहे. यासाठी नाशिक शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर परिसंवादाचे आयोजन सोमवार, दि. २६ आॅक्टोबरपासून केले जाणार असल्याची माहिती सनविवि फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज बच्छाव यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात शहरात एका १७ वर्षीय युवकाचा त्याच्या मित्रांनीच खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालयातील युवक व युवतींना परिसंवादातून जनजागृती करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष धीरज बच्छाव व जगदीश मेमोरियल फाउंडेशनचे केयूर कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Public awareness from tomorrow to prevent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.