‘स्मार्ट सिटी अन् स्वच्छ भारत’विषयी जनजागृती
By Admin | Updated: January 24, 2016 22:51 IST2016-01-24T22:51:44+5:302016-01-24T22:51:57+5:30
दाऊदी बोहरा समाजाचा उपक्रम

‘स्मार्ट सिटी अन् स्वच्छ भारत’विषयी जनजागृती
नाशिक : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’, ‘परिसर स्वच्छ तर देश स्वच्छ’, ‘स्वच्छतेची अधोगती, रोखी शहराची प्रगती’ अशा घोषणा देत बोहराबांधवांच्या ‘एमएसबी’ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती करत लक्ष वेधले.
दाऊदी बोहरा समाजाचे ५२वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मुहम्मद बुरहानुद्दीन साहेब यांची १०५वी जयंती आणि ५३वे धर्मगुरू सय्यदना आलीकादर मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या ७३व्या वाढदिवसाच्या औचित्यावर रविवारी (दि.२४) शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ व ‘स्मार्ट सिटी’ जनजागृती अभियान राबविण्यात आले.
दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक यांनी जनजागृती फेरीला ध्वज दाखवून शुभारंभ केला. टाकळी फाटा येथील एमएसबी विद्यालयापासून निघालेली जनजागृती फे रीचा कुतबी मशिदीजवळ समारोप करण्यात आला. यावेळी शहराचे सहायक अमील मोहम्मदभाई उज्जैनवाला, नगरसेवक सचिन मराठे, अर्चना थोरात, शब्बीर मर्चन्ट, सैफुद्दीन तलवारी, युसुफ जमाली आदि उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याबद्दल मुर्तुझा ट्रंकवाला व अमेरिकेतील खडतर अशी ‘रॅम’ सायकल स्पर्धेसाठी पात्र ठरलेले अम्मार मियाजी यांचा दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)