प्रांतांकडून चौकशी

By Admin | Updated: July 19, 2014 01:04 IST2014-07-18T22:43:38+5:302014-07-19T01:04:20+5:30

चांदवड : चांदवड येथील प्रांत कार्यालयात शासकीय सेवेत नसताना एक व्यक्ती गेल्या वर्षापासून महत्त्वाचे दस्तऐवजाचे दप्तर हाताळत आहे.

Provincial Investigation | प्रांतांकडून चौकशी

प्रांतांकडून चौकशी

चांदवड : चांदवड येथील प्रांत कार्यालयात शासकीय सेवेत नसताना एक व्यक्ती गेल्या वर्षापासून महत्त्वाचे दस्तऐवजाचे दप्तर हाताळत असल्याची गंभीर बाब निदर्शनास येताच ‘लोकमत’च्या त्या वृत्ताची तातडीने प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दखल घेऊन या व्यक्तीची चौकशी करून त्याला कार्यालयाबाहेर घालविले आहे व या कार्यालयात पुन्हा पाऊल टाकल्यास आपणाविरुद्ध तक्रार करू, असा सज्जड दमही दिला. दैनिक लोकमतमध्ये वृत्त येताच चांदवड येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश खैरनार हे प्रांताधिकारी दराडे यांना भेटले व त्यांना सदरचे वृत्त दाखविले तेव्हा खरा प्रकार प्रांत दराडे यांच्या लक्षात आला व त्यांनी म्हस्के नामक त्या व्यक्तीला तातडीने कार्यालयाबाहेर घालविले.
दरम्यान, असाच प्रकार चांदवड तहसीलदार कार्यालयात असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती; मात्र याबाबत तहसीलदार मनोज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चांदवड तहसीलदार कार्यालयात असा कुठलाही प्रकार नाही फक्त पुरवठा विभागात तात्पुरता एक कर्मचारी असल्याचे सांगितले. दिवसेंदिवस तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात अडवणुकीचे प्रकार सर्रास सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या घटना पोहचत नसल्याने असे प्रकार वाढत आहे.
दरम्यान, चांदवड तालुक्यात लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न असून, अजून नवीन असल्याने तालुका समजण्यास वेळ लागेल, असेही प्रांत दराडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Provincial Investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.