महिलांच्या प्रसाधनगृहाची सोय करा राष्टÑवादी महिलांचे मनपा आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:06 IST2018-04-09T01:06:12+5:302018-04-09T01:06:12+5:30
नाशिक : राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेसच्या वतीने नााशिक महापालिका उपआयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देऊन शहरातील प्रमुख ठिकाणांवर महिलांसाठी तातडीने प्रसाधनगृहाची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महिलांच्या प्रसाधनगृहाची सोय करा राष्टÑवादी महिलांचे मनपा आयुक्तांना साकडे
नाशिक : राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेसच्या वतीने नााशिक महापालिका उपआयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देऊन शहरातील प्रमुख ठिकाणांवर महिलांसाठी तातडीने प्रसाधनगृहाची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याचा महिलांना आनंद आहे. परंतु संपूर्ण नाशिक शहरात गर्दीच्या ठिकाणी मेनरोड, दहीपूल, भद्रकाली, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, सिडको पवननगर या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह बांधावीत व त्या प्रसाधनगृहांची स्वच्छता महिला कर्मचारी वर्गाकडून व्हावी. जागतिक आरोग्य दिन सर्वत्र साजरा होत असताना आम्हा नाशिककर महिला भगिनींची छोटीशी मागणी पूर्ण करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष सुषमा पगारे, हिना शेख, पुष्पा राठोड, शाकिरा शेख, संगीता गांगुर्डे, सलमा शेख, आशा भंदुरे, सुरेखा निमसे, रजनी चौरसिया, मंगला मोरे, शकिला शेख, शाहिन शेख, सुनीता जावळे, दीक्षा दोंदे, कल्पना सोनवणे आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.