लोकसहभागातून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:14 IST2020-10-27T18:13:01+5:302020-10-27T18:14:33+5:30
कळवण : तालुक्यातील शैक्षणिक कामकाजाचा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आढावा घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कनाशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी वडाळे वणी शाळेला लोकसहभागातून एलईडी स्मार्ट टीव्ही सुपूर्द करण्यात आला.

कळवण तालुक्यातील वडाळे वणी शाळेला लोकसहभागातून एलईडी स्मार्ट टीव्ही मुख्याध्यापक बाबुलाल सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करतांना नितीन पवार, लीना बनसोडे, डी एम बहिरम, हेमंत बच्छाव आदी.
कळवण : तालुक्यातील शैक्षणिक कामकाजाचा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आढावा घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कनाशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी वडाळे वणी शाळेला लोकसहभागातून एलईडी स्मार्ट टीव्ही सुपूर्द करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांचे लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने डोनेट ए डिवाइस हा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या प्रेरणेतून सुरू झाला आहे. या उपक्रमा अंतर्गत लोकसहभागातून स्मार्ट टीव्ही, जुना मोबाईल, रेडिओ, लॅपटॉप इतर ऑनलाईन शिक्षणाची साधने हे दान करण्याचे आवाहन केलेले आहे, त्याला ग्रामस्थांनी व दानशूर व्यक्तींना प्रतिसाद दिला. कळवण तालुक्यातील ओतूर केंद्रातील जि प शाळा वडाळे वणी या शाळेला लोकसहभागातून एलइडी स्मार्ट टीव्ही मुख्याध्यापक बी. जे. सोनवणे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ठाकरे, सरपंच यशवंत बागुल यांच्याकडे आमदार नितीन पवार वलीना बनसोड यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.