द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 03:37 PM2019-11-12T15:37:53+5:302019-11-12T15:38:22+5:30

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली.

 Provide insurance protection for grape crops year-round: Raju Shetty | द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

Next

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांची पाहणी केली, बागलान दौºयावर असताना ब्राह्मणगाव येथील २० हेक्टर क्षेत्रावरील १७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणीसाठी त्यांनी येथे भेट दिली. द्राक्ष उत्पादक नंदकिशोर भावराव अहिरे यांची आठ एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग पूर्णत: सततच्या पावसामुळे नष्ट झाल्याने लाखो रूपयांचा खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याने या बागेची पाहणी शेट्टी यांनी केली.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यावेळी श्री.शेट्टी यांनी सांगितले की, कोरड्या पेक्षाही ओल्या दुष्काळात शेतकरी अधिक खचून गेला आहे. खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी पिक विमा काढला आहे. तसेच ज्यांचे पीक विमा नाहीत परंतु सततच्या झालेल्या पावसामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी बरोबरच विजिबलमाफी दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. शेतकºयांच्या प्रश्नासाठी सत्ता कुणाचीही येवो, शेतकर्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आसुड ओढु, असा इशारा शेट्टी यांनी दिला. याप्रसंगी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप, साहेबराव मोरे, कुबेर जाधव, सुभाष अहिरे, तुषार शिरसाठ, राजू शिरसाठ, रमेश आहिरे, मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, तंटामुक्ती समतिीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Provide insurance protection for grape crops year-round: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक