निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याला सुविधा पुरवा
By Admin | Updated: June 24, 2015 01:30 IST2015-06-24T01:30:16+5:302015-06-24T01:30:41+5:30
निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याला सुविधा पुरवा

निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याला सुविधा पुरवा
नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याकरिता निघणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडी पालख्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना दिले. त्याआधी विजयश्री चुंभळे यांनी जिल्हा परिषदेत खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या. जिल्हा परिषदेच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आल्याचे समजते. तसेच पालखीसोबत एक पाण्याचा टॅँकर व वैद्यकीय पथक पाठविण्याच्या सूचनाही चुंभळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संत निवृत्तिनाथ महाराज पालखी समवेत राज्यातून एकूण ५० नोंदणीकृत दिंड्या सहभागी होत असून त्यात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकाळ सायंकाळ भोजन तयार करण्यासाठी १ ते २७ जुलैपर्यंत प्रत्येकी ४० गॅस सिलिंडर याप्रमाणे २००० गॅस सिलिंडरची शासकीय सूट पात्र सेवा दिंडी मार्ग नाशिक,अहमदनगर, सोलापूर जिल्'ातून मिळण्यात यावी. तसेच पालखी सोहळ्याचे कार्यक्रम पत्रिकेनुसार मार्गक्रमण करीत असलेल्या गावात वीज भारनियमन रद्द करावे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दरम्यान पालखी सोहळ्यास पोेलीस संरक्षण पुरविण्यात यावी, पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी, भाविकांसाठी आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात अशा सूचनांचा पत्रात समावेश आहे. (प्रतिनिधी)