राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST2021-07-18T04:11:26+5:302021-07-18T04:11:26+5:30

दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी गव्हाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी रायुकाँ ...

Provide appointment letters to NCP office bearers | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी गव्हाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी रायुकाँ जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, राविकाँचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, अनिल देशमुख, नीलेश गटकळ, तौसिफ मनियार, रोशन अपसुंदे, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप भैरे उपस्थित होते. यावेळी सुनील गव्हाणे यांनी पदाधिकाऱ्यांचा कामकाजाचा आढावा घेतला. राविकॉ जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जि. प. सदस्य भास्कर भगरे, तौसिफ मनियार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गौरव सोमवंशी, भूषण देवरे, अजय मेघणे, आशिष वडजे, नितीन भोये, अतुल घुमरे, भावनेश राऊत, भूषण गांगुर्डे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्षपदी रोशन कावळे, राविकों सोशल मीडिया तालुकाध्यक्ष समाधान मेधणे, उपाध्यक्ष अभिजित लोखंडे, साहील वडजे, सरचिटणीसपदी रोहित सोनवणे, तालुका सचिव मयूर हेंगडे, तालुका संघटकपदी अनिकेत पाटील, सत्यम आहेर, मंगेश पेलमहाले, महाविद्यालय अध्यक्षपदी चेतन अपसुदे, उमेश महाले, शहरध्यक्ष भास्कर गायकवाड, साहील मुलाणी आदींची निवड करण्यात आली. यावेळी गव्हाणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो- १७ दिंडोरी राष्ट्रवादी

दिंडोरी येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व पदाधिकारी.

170721\17nsk_31_17072021_13.jpg

फोटो- १७ दिंडोरी राष्ट्रवादी दिंडोरी येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व पदाधिकारी. 

Web Title: Provide appointment letters to NCP office bearers