मालेगावी महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST2021-05-18T04:14:37+5:302021-05-18T04:14:37+5:30

देशातील जनता कोरोना महामारीशी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस, कडधान्ये व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत ...

Protests of NCP against inflation in Malegaon | मालेगावी महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

मालेगावी महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

देशातील जनता कोरोना महामारीशी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस, कडधान्ये व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट दरवाढ केली आहे. तसेच रासायनिक खतांचेही दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग आर्थिक संकटात सापडले आहेत. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. लोकविरोधी धोरण राबविले जात आहे. केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाई कमी करावी, अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगाव जिल्हाध्यक्ष आसीफ शेख यांच्यासह आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

या आंदोलनात माजी नगरसेवक शकील जानीबेग, महेमूद शहा, रफीक भुऱ्या, ॲड. हिदायतुल्ला, नदीम फनीवाले, जहीरशा नबाबशा आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो फाईल नेम : १७ एमएमएवाय ०१ . जेपीजी

फोटो कॅप्शन :

मालेगावी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करताना माजी आमदार आसीफ शेख, शकील जानीबेग, महेमूद शहा, रफीक भुऱ्या, ॲड. हिदायतुल्ला, नदीम फनीवाले, जहीरशा नबाबशा आदींसह कार्यकर्ते.

===Photopath===

170521\17nsk_7_17052021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.

Web Title: Protests of NCP against inflation in Malegaon