शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

शिक्षकांवरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:28 IST

मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहे.

नाशिक : मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहे. नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) हुतात्मा स्मारकाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुतळा जाळून घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलकांपैकी चौघांना ताब्यात घेतले आहे.मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे गेल्या १४ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांविषयी ठोस आश्वासन न दिल्याने सोमवारी संघटनेने आक्रमक पवित्रा धारण केला. १०० टक्के अनुदानाशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देत शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’कडे मोर्चा वळविला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले असता शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. आझाद मैदानात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीमार केला. या घटनेचा राज्यभरात निषेध होत असताना पोलिसांनी शिक्षकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नाशिकमध्येही मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करू न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांपैकी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष समाधान बागुल, राज्य सदस्य राकेश पवार, राम सूर्यवंशी व सदाशिव गणगे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक