येवला : प्रकाश आंबेडकर, गुणरत्न सदावर्ते यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. तहसिलदार प्रमोद हिले यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव केल्याने प्रकाश आंबेडकर, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करण्यात आला.मराठा समाज शांततेन आंदोलन करत असतांना व कोरोना संकट असतांना केवळ समाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी आंबेडकर, सदावर्ते यांच्यासारखी मंडळी छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात. त्यामुळे मराठा समाजात उद्रेक होत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर संजय सोमासे, निंबाजी फरताळे, रोहिदास जाधव, दत्तात्रय सोमासे, आदित्य नाईक, अरविंद जोंधळे, निलेश घायाळ, सागर नाईकवाडे, अण्णासाहेब सोमासे आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (फोटो १२ येवला २)
येवल्यात प्रकाश आंबेडकर, सदावर्ते यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:42 IST
येवला : प्रकाश आंबेडकर, गुणरत्न सदावर्ते यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. तहसिलदार प्रमोद हिले यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
येवल्यात प्रकाश आंबेडकर, सदावर्ते यांचा निषेध
ठळक मुद्देश्रीमंत छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव .