शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नाशिकमध्ये विरोधी पक्षांचे गोदापात्रात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:25 IST

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवत पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी बुधवारी (दि.२४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देमराठावाड्यास पाणी सोडण्यास विरोधसत्ताधाऱ्यांचा अभिनव निषेध

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवत पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी बुधवारी (दि.२४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.यावेळी सर्वपक्षीयांनी गोदावरीची महाआरती केली. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी घेतला सदरचा निर्णय घेताना नाशिकच्या नागरिकांना पिण्यासाठी लागणार्या पाण्याचा अंदाज घेतलेला नाही तसेच नाशिकच्या जनतेसाठी धरणातून पाणी आरिक्षत केलेले नाही. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असे असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेल्याने सत्ताधारी वगळता सर्विपक्षयांनी एकत्र येत पाणी सोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.बुधवारी दुपारी मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामकुंडावर एकत्र येत पाण्यात उतरून गोदावरीची आरती करून हातात फलक घेत शासनाचा व सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविला. यावेळी धरण उपाशी कोरड घशाशी, पाणी नाही कुणाच्या बापाचे ते तर आमच्या हक्काचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर,मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनपा विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, माजी महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश बडवे, मनपातील गटनेता विलास शिंदे,माकपाचे कॉ. श्रीधर देशपांडे, नगरसेवक गजानन शेलार, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे,राजेंद्र बागूल, पुनम मोगरे, वैशाली भोसले, दिगंबर मोगरे, प्रवीण भाटे, खंडू बोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाईMarathwadaमराठवाडाShiv Senaशिवसेना