शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत करवाढीविरोधात कॉँग्रेसचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:18 IST

महापालिका : दरवाढ रद्द करण्याची मागणी

ठळक मुद्देमहापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक - महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्यावतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला.महापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे. या करवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर धरणे धरण्यात आली. यावेळी अहेर यांनी सांगितले, महापालिकेने करवाढीचा बोजा लादला असला तरी यात सरकारी कर समाविष्ट झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रत्येक मालमत्तेच्या करात दुपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे, सामान्यांबरोबरच व्यावसायिक उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. सदरची वाढ जनतेवर अन्याय करणारी आहे. अगोदरच नोटबंदी आणि जीएसटीच्या अपरिपक्व निर्णयामुळे जनता त्रस्त असून त्यात हा करवाढीचा बोजा पडणार आहे. सदर करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील, युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल दिवे, महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष वत्सला खैरे, सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, नगरसेवक आशा तडवी, अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष हनिफ बशीर, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे,उद्धव पवार, बबलू खैरे, प्रतिभा भदाणे, सुमन बागूल, सोनाली अहेर, संगिता बिरारी आदी सहभागी झाले होते.आयुक्तांना निवेदनकॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सदर घरपट्टी दरवाढ अन्यायकारक असून ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आयुक्तांनी नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथील शहरापेक्षा नाशिकचे दर खूपच कमी असल्याचे सांगत दरवाढीचे समर्थन केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcongressकाँग्रेस